माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
By Admin | Updated: July 30, 2016 21:41 IST2016-07-30T21:34:06+5:302016-07-30T21:41:42+5:30
इगतपुरी : जुन्या गोष्टींना उजाळा

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
इगतपुरी : येथील दर तीन ते चार वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र येतात व आपल्या एकमेकांच्या भावना व्यक्त करतात. निसर्गाच्या सान्निध्यात शाळा भरविली. इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलच्या १९८४ च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
आम्ही स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत एकमेकांच्या विचारांची देवाण- घेवाण होते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, तसेच ज्या-त्या वयोगटातील भावभावनांचे स्मरण होते, असे मनोगत अजित पारख यांनी व्यक्त केले.
१९८४ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी उद्योगपती, कुणी शेतकरी झाले, कुणी नोकरी करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर, काहींना नातू, पणतू झाले मात्र उच्च शिक्षण, नोकरी व्यवसाय आणि संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते.
त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शालेय सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप या आधुनिक संपर्क माध्यमांचा बराच उपयोग झाला. कुणी मुंबई कुणी नाशिक, तर कुणी पुणे सर्व लांब लांब गेलेले, आणि बघता-बघता शाळेच्या हजेरी पटावरील ३० ते ३५ हून अधिक मुले- मुली संपर्कात आली आणि इगतपुरीच्या डाक बांगला निसर्गरम्य परिसरात आपल्या कुटुंबासमवेत स्नेहसंमेलन आयोजित केले. याकामी ग्रुपलिडर सरोज आराध्या यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत काहीजण भावनाविवश झाले. आपण लहानपणी कशा खोड्या करायचो. काही सहभागी बायकांनी तुमच्या मित्राला मीच बोलके केले, असे सांगायला विसरल्या नाहीत.
यावेळी पुरुषोत्तम चांडक, अरविंद चांडक, नितीन चांडक, दिलीप छाजेड, अजित पारख, संजय बाठिया, अविनाश थोरे, हेमंत पानसे, सुशील पॉल, संजय गोरे, यशवंत उबाले, वसंत राठोड, रइस शेख, हारून शेख, श्रीकांत गायकवाड, प्रशांत गुजराथी, संतोष कदम, संतोष निखळे, संजय श्रीमाळी, अर्जुन खातले, रवींद्र पानगले, विजय गोडे, दीपक चव्हाण, दीपक परदेशी, संजय बेदरकर, भाऊ जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)