पाथर्डी फाटा रस्त्यावर गटारीचे घाण पाणी

By Admin | Updated: May 21, 2016 22:52 IST2016-05-21T22:50:40+5:302016-05-21T22:52:20+5:30

पाथर्डी फाटा रस्त्यावर गटारीचे घाण पाणी

Drainage Dirt Water on Pathardi Phata Road | पाथर्डी फाटा रस्त्यावर गटारीचे घाण पाणी

पाथर्डी फाटा रस्त्यावर गटारीचे घाण पाणी

इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील पोलीस वसाहत ते गामणेमळा रस्त्यावरून भूमिगत गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मार्गक्रमण करताना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे.
पोलीस वसाहत ते गामणेमळा रस्त्याच्या दोन्ही बाजूस विविध अपार्टमेंट आणि सोसायटी आहेत. त्यामुळे परिसरात पाच दिवसांपासून भूमिगत गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने घराची दारे व खिडक्या उघडणे मुश्कील झाले आहे. तसेच साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने रस्त्यावरून वाहणारे भूमिगत गटारीचे पाणी थांबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Drainage Dirt Water on Pathardi Phata Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.