सिन्नर महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:12 PM2020-08-13T18:12:01+5:302020-08-13T18:12:47+5:30

सिन्नर: भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांनी रंगनाथन यांच्या जीवनावर भाष्य केले.

Dr. S. R. Ranganathan Jayanti Celebration at Sinnar College | सिन्नर महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

सिन्नर महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

Next
ठळक मुद्दे रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ लायब्ररीयानशीप येथे गेले. 

सिन्नर: भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांनी रंगनाथन यांच्या जीवनावर भाष्य केले.

डॉ. रंगनाथन हे एक गणित विषयाचे तज्ञ प्राध्यापक होते. परंतू सन १९२४ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून पदभार स्वीकारले. डॉ. रंगनाथन यांचे जीवन परिचय म्हणजे त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १८९२ रोजी जुन्या मद्रास प्रांतातील (आताचे तामिळनाडू) तंजावर जिल्ह्यातील शियाली गावात या छोट्याशा गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शियालीच्या मुदलीयार हिंदू हायस्कूल मध्ये पूर्ण झाल्यानंतर १९१३ मध्ये चेन्नई येथील ख्रिश्चन कॉलेजातून इंग्रजी वांग्मय विषयातून पदवीचे शिक्षण घेतले.मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून म्हणून त्यांनी पदभार स्वीकारले. मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्यानंतर रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ लायब्ररीयानशीप येथे गेले. असे डॉ.रसाळ यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.डी.एम.जाधव, प्रा.आर.व्ही.पवार, डॉ.पी.आर.कोकाटे, डॉ.डी.एल.फलके, प्रा.श्रीमती जे.आर.बागुल, प्रा.एस.बी.कर्डक उपस्थित होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.सुभाष अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयीन सेवक सुधीर विधाते, , .पी.जी. गहिले यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Dr. S. R. Ranganathan Jayanti Celebration at Sinnar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.