डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
By Admin | Updated: April 15, 2015 00:47 IST2015-04-15T00:47:06+5:302015-04-15T00:47:36+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
सिडको : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सिडकोत विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील सार्वजनिक मंडळांच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित व जीवनपटावर विविध गाणी लावून जयंती साजरी करण्यात आली. उत्तमनगर येथे समितीचे प्रमुख सुनील जगताप यांच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास आमदार सीमा हिरे, वसंत गिते, संजय साबळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मामा ठाकरे, महेश हिरे, नगरसेवक शीतल भामरे, रत्नमाला राणे, बाळासाहेब पाटील, संतोष सोनपसारे, मुकेश शहाणे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुदाम कोंबडे, मोहन मोरे, सुमन जाधव आदि सहभागी झाले होते.