डॉ. मो. स. गोसावी यांचा जीवन साधना गौरवने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 01:39 AM2022-02-11T01:39:04+5:302022-02-11T01:39:28+5:30

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा मुख्य संचालक डॉ. मो. स. गोसावी यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरुवारी (दि.१०) ‘जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Dr. Mo. S. Gosavi's life sadhana honored with glory | डॉ. मो. स. गोसावी यांचा जीवन साधना गौरवने सन्मान

डॉ. मो. स. गोसावी यांचा जीवन साधना गौरवने सन्मान

Next

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा मुख्य संचालक डॉ. मो. स. गोसावी यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरुवारी (दि.१०) ‘जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. मो. स. गोसावी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिमाखदार सोहळ्यात ख्यातनाम मराठी अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dr. Mo. S. Gosavi's life sadhana honored with glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.