डॉ. पालवे यांची कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST2021-08-23T04:17:09+5:302021-08-23T04:17:09+5:30

येवला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उद्योग व वाणिज्य विभागात कार्यकारी सदस्य पदी डॉ. भास्कर पालवे यांची नियुक्ती करण्यात ...

Dr. Appointment of Palve as Executive Member | डॉ. पालवे यांची कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती

डॉ. पालवे यांची कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती

येवला : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उद्योग व वाणिज्य विभागात कार्यकारी सदस्य पदी डॉ. भास्कर पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार उद्योग व वाणिज्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष रमेश पवार यांनी सदर नियुक्ती केली आहे. डॉ. पालवे यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनातील उद्योग विभागात सहसंचालक, पर्यावरण विभागात शास्त्रज्ञ, के. व्ही. एन. नाईक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नाशिक येथे प्राचार्य तसेच महावितरणच्या ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. पवार यांचे हस्ते डॉ. पालवे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी रश्मी पालवे, डी. आर. भामरे, जुली डिसोझा आदी उपस्थित होते.

फोटो- २२ पालवे

220821\22nsk_13_22082021_13.jpg

फोटो- २२ पालवे 

Web Title: Dr. Appointment of Palve as Executive Member