जिल्ह्यात चर्मोद्योग व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:57 PM2020-01-25T22:57:50+5:302020-01-26T00:13:21+5:30

पूर्वापार भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानिपढ्या जपलेले कौशल्य लुप्त होत असताना चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारु पाला आला आहे. एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. जिल्ह्यातल्या शेकडो व्यापारी व हजार ते पंधराशे कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

The downward trend of the leather industry in the district | जिल्ह्यात चर्मोद्योग व्यवसायाला उतरती कळा

जिल्ह्यात चर्मोद्योग व्यवसायाला उतरती कळा

Next
ठळक मुद्देआर्थिक संकट : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प; पर्यायी वस्तूंमुळे बसतोय फटका

मनोज देवरे ।
कळवण : पूर्वापार भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानिपढ्या जपलेले कौशल्य लुप्त होत असताना चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारु पाला आला आहे. एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. जिल्ह्यातल्या शेकडो व्यापारी व हजार ते पंधराशे कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी व शहरात खाटिकांकडून छोटे व्यापारी चामडे गोळा करतात. त्या कातड्यांवर मीठ चोळून तो माल दहा ते पंधरा दिवस गुदामात ठेवला जातो. यानंतर मद्रास येथे पाठवला जात असे. परंतु मद्रास येथील कंपन्या विविध कारणांमुळे बंद झाल्याने या कातड्याला मागणी कमी झाल्याने दीडशे ते दोनशे रु पयाला विकले जाणारे कातडे वीस रु पये ते तीस रु पये अशा मातीमोल दारात विकण्याची वेळ चर्मकार व्यापाऱ्यांवर आली आहे.
चर्मोद्योगाला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने लिडकॉम, अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ तसेच चर्मकार उद्योग संघाची स्थापना केली असली तरी चामड्याशी संबंधित लघुउद्योजकांना कोणतीही मदत मिळत नाही, तर या क्षेत्रातील बड्या भांडवलदारांना कर्ज झटपट मिळते. त्यामुळे सावकारांकडून ८ ते १० टक्के व्याजाने कर्ज घ्यावे लागत असल्याची तक्र ार लघुउद्योजकांनी केली आहे. चामड्यांच्या वस्तूंवर पूर्वी कोणताही कर नव्हता आता कर आकारणी होत आहे. या व्यवसायाशी संबंधित कारागिरांपासून दुकानांतील कामगारांपर्यंत हजारो लोकांना उपासमारीची वेळ आली आहे.
परराज्यातील चामडे खरेदी करणाºया कंपन्या बंद झाल्याने चामडे निर्यातीला खीळ बसली आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ यामुळे व्यवसाय संकटात आहे़
- बाळासाहेब जाधव,
संत रोहिदास फुटवेअर, एक्सपोर्टर
आमचा पिढीजात व्यवसाय असून, मी गेल्या अनेक वर्षांपासून चमड्याच्या चपला बनवत होतो. परंतु आता प्लॅस्टिकच्या पादािणांना पसंती असल्याने व्यवसाय डळमळीत झाला आहे. शासनाने चर्मोद्योगांना नवसंजीवनी द्यावी़
-तुळशीराम जाधव,
चप्पल विक्र ेते

कच्च्या चामड्याचा दर (एका जनावरामागचा दर)
तीन वर्षांपूर्वी आत्ता
शेळी ११० ते २०० रु ., ३० ते ५० रु .
मेंढी २०० ते २५० रु . १० ते ३०रु.
म्हैस १००० ते १३०० रु ., ५०० ते ७००
बैल १२००० ते १७०० रु . ८०० ते १२००

Web Title: The downward trend of the leather industry in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.