वादळी पावसाने घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:11 IST2018-05-24T23:11:03+5:302018-05-24T23:11:14+5:30
वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने गंगापूर, ठाणेवासना ग्रामस्थांना झोडपून काढले असून घरावरील छप्पर उडाले. क्षतिग्रस्त घरातील साठवून ठेवलेले धान्यही पावसात भिजल्याने अनेक कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.

वादळी पावसाने घरांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने गंगापूर, ठाणेवासना ग्रामस्थांना झोडपून काढले असून घरावरील छप्पर उडाले. क्षतिग्रस्त घरातील साठवून ठेवलेले धान्यही पावसात भिजल्याने अनेक कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. ही घटना बुधवारी घडली. प्रशासनाने चौकशी करून क्षतिग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक गावातील घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबीयांवर आघात झाला. तालुक्यातील मौजा- गंगापूर येथील अनेकांचे निवारेच जमीनदोस्त झाले. क्षतिग्रस्त बंडू पत्रुजी शिंदे, माधव महारू गुड्डी, लक्ष्मण चिमन्नाजी कलसार, प्रवीण लक्ष्मण कलसार, गणपती धर्मा शिंदे, भाऊजी शिवा डाहले, राजकुमार हसे, सुखराम पुंजाराम शिंदे, शरद ढवस यांच्या घरांची हानी झाली.
तसेच ठाणेवासना येथील विनोद वसंत मेश्राम, विठोबा कोसरे, गुरुदास सोनटक्के, चतूर मेश्राम, मारोती मडावी, राजेश्वर मरस्कोले, अनिल कुळमेथे, बोडकू मडावी, विठ्ठल कुळमेथे, श्रीधर ऊरवते यांच्या घराची व धान्याची नासाडी झाली. पं. स. सदस्य गंगाधर मडावी यांनी क्षतिग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहे. लागलीच तालुका प्रशासनाने दखल घेतली आहे.