शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

शहरातील गुन्हेगारीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:34 IST

नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलच्या तुलनेत गेल्या महिन्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावला. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा राज्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून केली गेली आणि नागरिक आपापल्या घरात बंदिस्त झाले. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, गजबजणाऱ्या बाजारपेठा ओस पडल्या सर्व व्यवहार ठप्प झाले आणि सर्वत्र ‘लॉकडाऊन’ दिसून आले. यामुळे हळूहळू मार्च व एप्रिलमध्ये घात, अपघातासोबत अन्यप्रकारची गुन्हेगारीसुद्धा ‘लॉक’ झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत होते. या लॉकडाऊनच्या काळात शहर गुन्हे शाखेने काही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्यासुद्धा बांधल्या; मात्र जेव्हापासून अनलॉकची घोषणा झाली आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून पुन्हा गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.एप्रिलमध्ये शहरात तीन प्राणघातक हल्ले झाले, तर मे महिन्यात या प्रकाराचे नऊ गुन्हे घडले. शहरात एप्रिलमध्ये दोनवेळा जबरी चोरीचा गुन्हा घडला, तर मे महिन्यात दहा जबरी चोरीचे गुन्हे घडले. घरफोड्यांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये आणि अनलॉकमध्ये सारखेच राहिल्याचे दिसते. तसेच अपहरणाचे प्रकार आणि रस्ते अपघाताच्या दुर्घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसते.चालू महिन्याच्या पंधरवड्यातसुद्धा हाणामारी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोड, दंगलीसारखे गुन्हेसुद्धा घडले आहेत. जाखोरीमध्ये, तर पतीने पत्नीची कोयत्याने हत्त्या केल्याचे उघडकीस आले.-------------------------महिलासुरक्षेचाप्रश्न गंभीरलॉकडाऊन काळातमहिलांवरील हिंसाचाराबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला गेला मात्र १९ विनयभंगाच्या, तर दहा बलात्काराच्या घटना आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे दहा प्रकार समोर आले.-------------------रस्ते अपघातात१४ लोकांचा मृत्यूलॉकडाऊन काळात रस्ते अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य झाले होते; कारण अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळता रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने गायब झाली होती; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघातांचे सत्र सुरू झाले. अपघातात १४ लोकांचे प्राण मे महिन्यात गेले. एप्रिलमध्ये अपघातात केवळ तीन लोकांचा मृत्यू झाला होता.---------------पोलीसगस्तीचा होता धाकनाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलीस वाहनांच्या उद््घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलीसग्रस्तीचे प्रमाणही कमी झाले; यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. २४ तास शहरातील रस्त्यांवर पोलीस दिसत होते. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस नजरेस पडत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसला होता.

 

टॅग्स :Nashikनाशिक