शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दोडीत रंगली काठी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:07 IST

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्तीसाठी बोकडांचा बळी देण्यात आला.

ठळक मुद्देम्हाळोबा महाराज यात्रोत्सव : पहिल्या दिवशी नवसपूर्तीसाठी गर्दी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्तीसाठी बोकडांचा बळी देण्यात आला.राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. गुरुवारी रात्री येथील भाविकांनी निफाड तालुक्यातील तामसवाडी येथून गोदावरीचे पाणी आणले. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेल्या गंगेचे पाणी व पंचमृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सुरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रुक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चाललेल्या मिरणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे २०० बोकडांचा बळी देण्यात आला. यावेळी नैवेद्य दाखविण्यात आला. शनिवारी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची मिरवणूक होऊन त्यांची देवभेट घडविली जाते. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून, मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत.तीन दिवस चालणाºया यात्रेत पहिल्या दिवशी स्थानिक भक्त मंडळींकडून कावडीद्वारे गंगेचे पाणी आणून म्हाळोबा महाराजांना अभ्यंगस्थान घालण्यात आले. त्यानंतर गावातून मुखवट्याची मिरवणूक काढून विधिवत पूजा करु न मंदिरात त्याची स्थापना करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे