गुन्हेगारांचे दुहेरी हत्त्याकांड

By Admin | Updated: January 8, 2017 01:09 IST2017-01-08T01:09:45+5:302017-01-08T01:09:58+5:30

गुन्हेगारांचे दुहेरी हत्त्याकांड

The double murder of criminals | गुन्हेगारांचे दुहेरी हत्त्याकांड

गुन्हेगारांचे दुहेरी हत्त्याकांड

त्र्यंबकेश्वर : जव्हार रोडवरील तोरंगण घाटातील दरीत शुक्रवारी (दि़ ८) सकाळी शहरातून तडीपार करण्यात आलेला अर्जुन महेश आव्हाड (२६, रा़सातपूर कॉलनी, अशोकनगर, सातपूर) व त्याचा मित्र निखिल विलास गवळी (२३, गोपालनगर, अमृतधाम, नाशिक) या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले़ या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह दरीत फेकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज खरा ठरला. सातपूरच्या जगतापवाडीतील पीएल गु्रपच्या कार्यालयात ३१ डिसेंबरलाच या दोन्ही सराईत गुन्हेगारांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे मृतदेह दरीत फेकण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या पीएल ग्रुपचे सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर (२५, सावतानगर नाशिक), निखिल मधुकर निकुंभ (२४, खुटवडनगर, कामटवाडे, नाशिक) प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार यांना प्रारंभी अटक केली. अधिक तपासात लोंढे यांचे पुत्र भूषण याचाही यात सहभाग निश्चित झाल्यानंतर तो फरार झाला. पोलिसांना चार महिने चकमा देण्यात यशस्वी झालेल्या भूषण लोंढे व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पुण्याहून ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र त्याच्या जामिनावरून बरेच भवती न भवती सुरू झाले. लग्न तोंडावर असलेल्या भूषण याला न्यायालयाने अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला, परंतु लग्नानंतर पुन्हा त्याने पोलिसांना चकमा दिला. याचदरम्यान प्रकाश लोंढे यांनाही पोलिसांनी या घटनेतील अन्य आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना घडलेल्या या घटनेचे कवित्व वर्षभर सुरू राहिले.

Web Title: The double murder of criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.