सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा

By Admin | Updated: April 21, 2016 00:13 IST2016-04-21T00:11:02+5:302016-04-21T00:13:11+5:30

सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा

The double hatchetka of Satpur | सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा

सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा


नाशिक : शिवाजीनगरजवळील कार्बन नाक्याच्या मागे सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या पल्लवी संसारे (३२) व विशाल संसारे (६) या माय-लेकाच्या निर्घृण हत्त्येचा उलगडा झाला असून, घरमालकाचा मुलगा संशयित रामदास रंगनाथ शिंदे यास पोलीसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत उपायुक्त धिवरे यांनी सांगितले की, कचरू संसारे हा गत चार वर्षांपासून रंगनाथ शिंदे यांच्या खोलीमध्ये भाडेतत्त्वावर राहतो़ चार दिवसांपूर्वी संसारे कुटुंबीय माहेरी गेले होते़ रविवारी (दि़१७) कचरू संसारे यांना रात्रपाळी असल्याने हे सर्व दुपारी नाशिकला आले़ संसारे हे ड्यूटीवर गेल्यानंतर रात्री बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास घरमालकाचा मुलगा रामदास शिंदे याने आतील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला़ यानंतर पल्लवी संसारे यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केल्याने शिंदे याने त्यांच्यावर धारदार हत्याराने सुमारे २० ते २५ वार केले़ तर आईच्या आवाजाने जाग आलेल्या विशालवर सुमारे १५ वार केले़ यामध्ये या माय-लेकाचा मृत्यू झाला़
संशयित रामदासने घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला़ यानंतर तो रात्रभर विल्होळी नाका, सीबीएस या ठिकाणी फिरत होता़ सकाळी एक्सलो पॉइंटजवळील पंचरत्न हॉटेलमध्ये शिंदे बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्यास अटक केली़ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदेला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The double hatchetka of Satpur