तलवारबाजी स्पर्धेत नाशिकला दुहेरी मुकुट
By Admin | Updated: May 21, 2014 00:24 IST2014-05-21T00:16:23+5:302014-05-21T00:24:30+5:30
नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली.

तलवारबाजी स्पर्धेत नाशिकला दुहेरी मुकुट
नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली.
सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयसिंह भोसले, संघटनेचे राज्य सचिव अशोक दुधारे, डॉ. उदय डांेगरे, राहुल वाघमारे, राजू शिंदे, डॉ. पांडुरंग रणमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल : १२ वर्षांआतील : शंतनू पाटील (फॉईल- रजत, इपी- सुवर्ण), नितीश अग्रवाल (सायबर- सुवर्ण, इपी- कांस्य).
१४ वर्षांआतील सबज्युनिअर : रुत्विक शिंदे (फॉईल- सुवर्ण, इपी- सुवर्ण), आदित्य गोरे (सायबर- सुवर्ण).
१७ वर्षांआतील कॅडेट : रुत्विक शिंदे (फॉईल- रजत), आदित्य गोरे (सायबर- कांस्य), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण, इपी- रजत), रोशनी मुर्तडक (इपी - सुवर्ण), सायली सूर्यवंशी (सायबर- कांस्य).
१९ वर्षांआतील ज्युनिअर : अमरसिंग (सायबर- सुवर्ण), शरयू पाटील (फॉईल- सुवर्ण, इपी- सुवर्ण), रोशनी मुर्तडक (इपी- रजत, फॉईल- कांस्य), सायली सूर्यवंशी (सायबर- कांस्य).
२३ वर्षांआतील युथ : दुर्वेश वाघ (इपी- कांस्य), दुश्यंत शिर्के (सायबर- सुवर्ण), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण), अस्मिता दुधारे (फॉईल- रजत, इपी- कांस्य), स्नेहल विधाते (सायबर- सुवर्ण).
वरिष्ठ गट : दुश्यंत शिर्के (सायबर- सुवर्ण), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण), अस्मिता दुधारे (इपी- सुवर्ण, फॉईल- कांस्य), रोशनी मुर्तडक (इपी- रजत), स्नेहल विधाते (सायबर- सुवर्ण).