सामाजिक न्यायाची वसतिगृहे, कोरोना संकटात बनली आरोग्य मंदिरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:57+5:302021-08-13T04:18:57+5:30

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर बनल्याने समाजातील अनेक घटकांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले, तर अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीस ...

Dormitories of social justice, health temples in Corona crisis! | सामाजिक न्यायाची वसतिगृहे, कोरोना संकटात बनली आरोग्य मंदिरे !

सामाजिक न्यायाची वसतिगृहे, कोरोना संकटात बनली आरोग्य मंदिरे !

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर बनल्याने समाजातील अनेक घटकांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले, तर अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीस गमवावे लागले आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समाजातील असंख्य घटकांनी कशोसीने प्रयत्न केले. यात वसतिगृहे व निवासी शाळा ही आरोग्य मंदिरे बनल्याचे दिसून आले. राज्यातील एकूण ४४१ शासकीय वसतिगृहांतून जवळपास ४५ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय दरवर्षी होत असते. या सुसज्ज इमारतीमधील सोयी-सुविधांमुळे कोविड-१९ च्या कालावधीत शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा भार काही प्रमाणात हलका झाल्याचे दिसून आले.

नाशिक विभागात ५३ शासकीय वसतिगृहांपैकी २५ शासकीय वसतिगृहे तर १० निवासी शाळांपैकी ६ निवासी शाळा स्थनिक प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यात नासर्डी पुलासमोरील समाज कल्याण परिसरात ३ वसतिगृह, आडगाव येथील मुलांचे शासकीय वसतिगृह, येवला, पिंपळगाव येथील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांचा समावेश असून अशाच प्रकारे धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या जिल्ह्यांमधील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांनीही कोरोना संकटात आरोग्य मंदिरे होऊन महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

120821\12nsk_29_12082021_13.jpg

सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वसतिगृह

Web Title: Dormitories of social justice, health temples in Corona crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.