मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:17+5:302021-07-09T04:11:17+5:30
नाशिक महापालिकेच्या सुरू करण्यात आलेल्या बस सेवेच्या लोकार्पणासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते. यावेळी कालिदास कलामंदिरात ते माध्यम प्रतिनिधींशी ...

मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका
नाशिक महापालिकेच्या सुरू करण्यात आलेल्या बस सेवेच्या लोकार्पणासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते. यावेळी कालिदास कलामंदिरात ते माध्यम प्रतिनिधींशी बेालत होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला. त्यात मुंडे यांना टाळण्यात आल्याने त्या नाराज असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना, त्या नाराज नसल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिले गेल्याने भाजप-शिवसेनेच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर परिणाम होईल, अशी चर्चा आहे, यासंदर्भात बोलताना फडणवीस यांना विचारले असता, चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. नारायण राणे यांची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रीपद दिले गेले आहे. बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार केलेला नाही, असे स्पष्टीकरण देतानाच, संभाव्य युतीच्या चर्चांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातून नारायण राणेंसह चौघांना स्थान मिळाले आहे. याचा महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्फो...
फडणवीस म्हणाले, मी ‘ईडी’चा प्रवक्ता नाही!
भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच त्यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी, 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', असे सांगून उत्तर देणे टाळले. ईडी त्यांचे काम करीत आहे. चौकशीतून काय ते समोर येईलच, असेही त्यांनी यावेळी सांगितले.