शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’: ठाणे मॅरेथॉन विजेती आरती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:17 IST

नाशिक-  मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या अ‍ॅथलेटीकसाठी एक विजय गरजेचा होताथांबायचे नाही, खुप मिळवायचे आहे

नाशिकमॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे. नुकतीच ठााणे मॅरॅथॉन स्पर्धा जिंकणा-या आरती पाटील हिच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : ठाणे मॅरेथॉन तुझ्यासाठी नवीन नाही, यापूर्वीदेखील ही स्पर्धा जिंकलेली आहे. हा विजय तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे.पाटील : ठाणे मॅरेथॉन यापूर्वी मी २०१७ मध्ये जिंंकलेली आहे. त्यानंतरही अनेक मॅरेथॉनमध्ये नाशिकचे नाव उंचावता आले आहे. यश, अपयश हा खेळाचा एक भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत एका मोठ्या विजयाची गरज होती. नाशिकसाठी आणि अन्य धावपटूंनादेखील बुस्ट मिळण्यासाठी हे गरजेचे होते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्ससाठी मोठ्या विजयाची गरज होती. या विजयामुळे माझ्यासह सर्वांना ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच या विजयाचे जास्त कौतुक आहे.

प्रश्न : तुझ्या खेळातील सातत्य आणि कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. तुझ्या कामगिरीकडे तू कसे बघते.पाटील : इयत्ता पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केलेली आहे. आज दहा वर्षे पूर्ण झाली असून, मागे वळून पाहिले तर खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा असल्यामुळे मला अजून थांबायचे नाही. खूप काही करायचे आहे, मिळवायचे आहे. कविता, मोनिका, संजीवनी यांचा आदर्श आणि मार्गदर्शन असल्यामुळे तर आणखीनच उत्साह संचारतो. तरीही खूप मोठा असा विचार केलेला नाही. सध्या एव्हढेच समजते की ‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’, त्यामुळे लागलीच फार मोठे स्वप्न सांगता येणार नाही. परंतु आलेल्या प्रत्येक स्पर्धेचा सराव मात्र कसून करते.

प्रश्न : सराव आणि शिक्षण याचा ताळमेळ तू कसा साधते? दिनचर्या कशी आहे?पाटील : सरावात सातत्य ठेवावेच लागते, प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांचे गुरूतुल्य मार्गदर्शन असल्यामुळे सरावाचे योग्य सूत्र साधत नियमित रोज सकाळी दोन तास सराव, त्यानंतर डायट, दुपारी कॉलेज, त्यानंतर दुपारी पूर्णपणे आराम आणि सायंकाळी पुन्हा दोन तास सराव. सरावानंतर अभ्यास असा रोजचा दिनक्रम आहे.मुलाखत : संदीप भालेराव 

टॅग्स :NashikनाशिकthaneठाणेMarathonमॅरेथॉन