बांधकाम मजुरांच्या भोजनात कसूर नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:47+5:302021-09-24T04:17:47+5:30
राज्य शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सातपूर येथील माध्यान्ह भोजन योजनेच्या प्रारंभाप्रसंगी ...

बांधकाम मजुरांच्या भोजनात कसूर नको
राज्य शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सातपूर येथील माध्यान्ह भोजन योजनेच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ यांनी पुढे सांगितले की, राज्यातील आघाडी सरकारने बांधकाम कामगारांसाठी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना आणली आहे. खऱ्या अर्थाने दि. १ मे २०११ रोजी त्यावेळच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. सद्य:स्थितीत या महामंडळाकडे ११ हजार कोटी रुपये जमा आहेत. त्यात वाढ होत आहे. या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील १८ लाख ७५ हजार आणि नाशिक जिल्ह्यातील ३४ हजार ५०० नोंदीत कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांची जेवणाची अडचण दूर करण्यासाठी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये माध्यान्ह भोजन योजना आजपासून सुरू केली आहे. ही योजना नोंदीत किंवा अनोंदीत कामगारांसाठी लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांनी रीतसर नोंदणी करून घ्यावी. जिल्ह्यात २५ ते ३० हजार बांधकाम कामगार असून, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोविड काळात गोरगरीब कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होणार आहे. ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने यात कोणत्याही प्रकारच्या चुका होता कामा नयेत. कोणतीही तक्रार येता कामा नये, अशी तंबीही त्यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा उपायुक्त सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शशिकांत जाधव, आदी उपस्थित होते. कामगार उपायुक्त विकास माळी यांनी प्रास्तविक केले. सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे यांनी स्वागत केले, तर सुजित शिर्के यांनी आभार मानले.
(फोटो २३ सातपुर) माध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकर, विकास माळी, सुरेश खोडे, दीपक पांडेय, बाळासाहेब क्षीरसागर, रंजन ठाकरे, आदी उपस्थित होते.