शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कमाविलेल्या ‘खाकी’वर डाग लागू देऊ नका : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 16:30 IST

काळानुरूप सुरक्षेची आव्हाने बदलली असून पोलीस दलानेही आधुनिकतेची कास धरली आहे. तलवारीचा इतिहास शौर्य गाजविणारा नक्कीच आहे; मात्र...

ठळक मुद्देवर्दीवर कुठलाही कलंक लागणार नाही, याची खबरदारी घ्या‘आपलं सरकार’ पोलिस दलाच्या पाठीशीराज्यापुढे सुरक्षेची विविध आव्हाने

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास राहिला आहे. या पोलीस दलाचा मला नेहमीच गर्व वाटतो. राज्याच्या सुरक्षेसाठी सदैव कटीबध्द असणाऱ्या पोलीस दलाचे तुम्ही उपनिरिक्षक दर्जाचे अधिकारी म्हणून आज शपथ घेतली, त्यामुळे तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल, यात शंका नाही. सरकार म्हणून मी नेहमी पोलीस दलाच्या पाठीशी आहे. आपले सेवाव्रत निष्ठेने जोपासताना चारित्र्यासह कमविलेल्या वर्दीवर कुठलाही कलंक लागणार नाही, याची सर्वोतोपरी खबरदारी घ्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिकच्या संस्थेत सरळसेवेची परिक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांच्या क्रमांक ११७च्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात सोमवारी (दि.३०) येथील कवायत मैदानावर पार पडला. यावेळी ६८८ प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांनी सशस्त्र संचलन करत ठाकरे गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांना मानवंदना दिली. ठाकरे यांच्या हस्ते अष्टपैलू कामगिरी करत प्रशिक्षण कालावधीत विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणारे सोलापूर जिल्ह्यातील संतोष अर्जुन कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’)  म्हणून गौरविण्यात आले. उपनिरिक्षक विजया पवार यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी ठाकरे पुढे म्हणाले, राज्यापुढे सुरक्षेची विविध आव्हाने उभी ठाकली आहेत; मात्र राज्याचे पोलीस दल त्या आव्हानांशी दोन हात करण्यासाठी सक्षम आहे. या दलाचे तुम्ही घटक असून भविष्यात निष्ठेने आपले कर्तव्य बजवावे, असे ठाकर यावेळी म्हणाले. दरम्यान, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी अहवाल वाचन केले....आता यापुढे ‘रिव्हॉलव्हर ऑफ ऑनर’काळानुरूप सुरक्षेची आव्हाने बदलली असून पोलीस दलानेही आधुनिकतेची कास धरली आहे. तलवारीचा इतिहास शौर्य गाजविणारा नक्कीच आहे; मात्र काळानुरूप शस्त्र बदलावीच लागतात. त्यामुळे आता यापुढे ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ म्हणून मानाची तलवार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीला प्रदान करण्याऐवजी मानाची रिव्हॉलव्हर प्रदान केली जावी, अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण्याच्या अखेरीस केली.

‘आपलं सरकार’ पोलिस दलाच्या पाठीशीआपलं सरकार पोलीस दलाच्या पाठीशी आहे. वर्षभराचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही उपनिरिक्षक म्हणून स्वत:ला या प्रबोधिनीत घडविले. राज्यभरातील पोलीसांना घडविणाºया येथील प्रबोधिनीचा अवघ्या देशाला नव्हे तर जगाला हेवा वाटेल, अशा सर्व भौतिक व आधुनिक सोयीसुविधा प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून उपलब्ध करून देण्यासाठी मी वैयक्तिक लक्ष देईल, असे वचन ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरे