सटाण्यात ट्रकच्या अपघातात गाढव ठार

By Admin | Updated: May 22, 2014 17:18 IST2014-05-21T23:20:44+5:302014-05-22T17:18:09+5:30

सटाणा : शहरातून जाणार्‍या विंचूर -प्रकाशा राज्य महामार्गावरील दुभाजक जीवघेणे ठरत असून, पादचार्‍यांची मोठी डोकेदुखी झाली आहे.

The donkey was killed in a truck accident | सटाण्यात ट्रकच्या अपघातात गाढव ठार

सटाण्यात ट्रकच्या अपघातात गाढव ठार

सटाणा : शहरातून जाणार्‍या विंचूर -प्रकाशा राज्य महामार्गावरील दुभाजक जीवघेणे ठरत असून, पादचार्‍यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास मार्बल फरशी घेऊन जाणारा मालट्रक दुभाजकावर चढल्यामुळे झालेल्या अपघातात एक गाढव जागीच ठार झाले. सटाणा शहरातील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरदरम्यान वाढत्या वाहतुकीमुळे दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र हे दुभाजक जीवघेणे ठरू लागले आहेत. दर चार - सहा महिन्यात या दुभाजकांवर मालमोटार, टँकर जाऊन आदळत आहे. सटाणा बसस्थानक ते शिवाजी पुतळ्यादरम्यान असलेले दुभाजक मोठी डोकेदुखी बनले आहेत. या राज्य महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बँका, शाळा, महाविद्यालये, शासकीय - निमशासकीय कार्यालये असल्याने प्रचंड वाहतूक आहे. पहाटे वाहतूक नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. येथील स्टेट बँकेजवळ असलेल्या रस्ता दुभाजकावर फरशीने भरलेला ट्रक (क्र. एमएच ०९ बीसी ७३६२) पुढे गाढव आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर आदळला. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे वळण रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: The donkey was killed in a truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.