डोंगरगावी शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST2021-07-07T04:16:25+5:302021-07-07T04:16:25+5:30
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास ...

डोंगरगावी शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीसपाटील प्रल्हाद केदारे यांनी देवळा पोलिसांत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच दयाराम सावंत आणि पोलीसपाटील प्रल्हाद केदारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
छबू दादाजी केदारे (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ते दि. ३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले होते. अंधारात अंदाज न आल्याने पाय घसरून ते विहिरीत पडले. नातलगांनी बाहेर काढून मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. देवळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक योगेश क्षीरसागर यांनी पंचनामा केला.
अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.