रक्तदान करा, एक किलो पनीर घेऊन जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:41+5:302021-06-21T04:11:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महानगरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सिडको परिसरात शिवसेना ...

Donate blood, take a kilo of cheese | रक्तदान करा, एक किलो पनीर घेऊन जा

रक्तदान करा, एक किलो पनीर घेऊन जा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महानगरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सिडको परिसरात शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक नगरसेवकांनी विविध उपक्रम राबविले होते. असाच एक आगळावेगळा उपक्रम किरण दराडे व बाळा दराडे या दाम्पत्याने राबवून रक्तदान करा व एक किलो पनीर घेऊन जा, अशी शक्कल लावत नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.

प्रत्येक रक्तदात्याला एक किलो पनीर वाटण्यात येऊन नागरिकाना प्रेरित करण्यात आले. या शिबिरात ७३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, वसंत गीते, सुनील बागुल, विलास शिंदे, दत्ता गायकवाड़, विनायक पांड़े, पुंजाराम गामणे, आनंद घुगे, विक्रम सांगळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Donate blood, take a kilo of cheese