‘जनसेवा’चे वर्चस्व

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:52+5:30

वाजगाव : विविध कार्यकारी सहकारी संस्था

Domination of 'Janseva' | ‘जनसेवा’चे वर्चस्व

‘जनसेवा’चे वर्चस्व

देवळा : वाजगाव विविध कार्यकारी सह. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा पॅनलने सात जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. नम्रता पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले.
निवडणुकीत सुनील धर्मराज देवरे व सुनील नरहरी देवरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे नम्रता पॅनलची निर्मिती केली होती. संजय गायकवाड, बापू देवरे, अमोल देवरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते. १३ जागांसाठी होणाऱ्या ह्या निवडणुकीत जनसेवा पॅनल सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याने नम्रता पॅनल बाजी मारेल असा अंदाज होता. परंतु जनसेवा पॅनलने सात जागांवर विजय मिळवत सत्ता प्राप्त केली. ४५२ पैकी ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ह्यावेळी प्रभारी सहायक निबंधक डी. एन. देशमुख, कुदळे, एस. बी. पगार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश देवघरे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Domination of 'Janseva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.