शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मुसळगावी प्रगती पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 8:40 PM

मुसळगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुसळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी मुसळेश्वर प्रगती  पॅनलने आठ जागांवर विजय मिळविला तर दोन जागा अवघ्या दोन-दोन मतांनी गमावल्याने पॅनलला जबरदस्त धक्का बसला. मुसळेश्वर परिवर्तन  पॅनलला पॅनलचे नेते गोविंद माळी यांचा पराभव झाला असला, तरी त्यांच्या पॅनलने सहा जागांवर विजय मिळविला आहे. कमकुवत समजलेल्या तिसऱ्या आघाडीने ठरवून तीनच जागांवर उमेदवार उभे केले व त्या तीनही जागांवर यश मिळवले.

ठळक मुद्देपरिवर्तनला सहा जागा : दोन मतांच्या फरकाने दोघांचा पराभव

मुसळगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुसळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी मुसळेश्वर प्रगती  पॅनलने आठ जागांवर विजय मिळविला तर दोन जागा अवघ्या दोन-दोन मतांनी गमावल्याने पॅनलला जबरदस्त धक्का बसला. मुसळेश्वर परिवर्तन  पॅनलला पॅनलचे नेते गोविंद माळी यांचा पराभव झाला असला, तरी त्यांच्या पॅनलने सहा जागांवर विजय मिळविला आहे. कमकुवत समजलेल्या तिसऱ्या आघाडीने ठरवून तीनच जागांवर उमेदवार उभे केले व त्या तीनही जागांवर यश मिळवले.सिन्नर तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात सशक्त समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी मुसळगाव ग्रामपंचायत आहे.औद्योगिक सहकारी वसाहतीचा कर ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने अनेक विकासकामे मार्गी लावता येतात, तसेच तरुणांनी निवडणुकीत घेतलेल्या सहभागामुळेही निवडणूक अत्यंत अटीतटीची पार पडली. सतरा जागांवर झालेल्या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये रूपाली पिंपळे या विजयी झाल्या. तर मीरा काकड यांनी भारती गुरव यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. प्रभाग दोनमध्ये तुल्यबळ लढतीत दत्तु ठोक, तसेच सचिन सिरसाट, योगिता सिरसाट विजयी झाले.

प्रभाग तीनमध्ये सुनीता मोरे, एकनाथ सिरसाट व संध्या राजगुरु विजयी झाले. प्रभाग चारमध्ये शुभम माळी या नवोदिताने परिवर्तन पॅनलचे नेते गोविंद माळी यांचा पराभव केला. चंचल सांगळे व शुभांगी घोलप विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये मुसळेश्वर प्रगती  पॅनलचे राजू जाधव बिनविरोध निवडून आले. तर रवींद्र शिंदे व माया जाधव विजयी झाले. प्रभाग सहामध्ये तिसऱ्या आघाडीने तीनही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. यात अनिल सिरसाट ,सुवर्णा सिरसाट व हिराबाई माळी यांचा समावेश आहे.सरपंचपदासाठी चुरससरपंच आरक्षण सर्वसाधारण गटाचे निघाले तर मुसळगावला ऐनवेळी सत्ता मिळवण्यासाठी तिसऱ्या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावेळी विजयी उमेदवारांनी गावात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक