स्नेहनगरमधील घरफोडीत रोकड लंपास
By Admin | Updated: December 14, 2015 00:18 IST2015-12-14T00:18:30+5:302015-12-14T00:18:30+5:30
स्नेहनगरमधील घरफोडीत रोकड लंपास

स्नेहनगरमधील घरफोडीत रोकड लंपास
नाशिक : म्हसरूळ परिसरातील स्नेहनगरमधील कार्यालय फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली आहे़ पंचवटीतील रोहिणीनगरमधील रहिवासी मुकुंद रामलाल हिरावत (४६) यांचे पंचवटीतील स्नेहनगरमध्ये कार्यालय आहे़ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेले ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी हिरावत यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़