त्रिमूर्ती चौकातील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

By Admin | Updated: June 24, 2017 17:49 IST2017-06-24T17:49:37+5:302017-06-24T17:49:37+5:30

बंद घराच्या मागच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली आहे़

Domestic gold ornaments lump in Trimurti Chowk | त्रिमूर्ती चौकातील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

त्रिमूर्ती चौकातील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : बंद घराच्या मागच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली आहे़ त्रिमूर्ती चौकातील रहिवासी दीपाली चोथवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ ते २३ या कालावधीत त्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कॅमेरा असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Domestic gold ornaments lump in Trimurti Chowk