डोंबिवलीच्या गुन्हेगारास नाशकात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:43 AM2020-01-05T04:43:19+5:302020-01-05T04:43:24+5:30

कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावर वाद घालून एका इसमावर गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या डोंबिवलीच्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पंचवटीत अटक केली.

The Dombivali crime convicts | डोंबिवलीच्या गुन्हेगारास नाशकात ठोकल्या बेड्या

डोंबिवलीच्या गुन्हेगारास नाशकात ठोकल्या बेड्या

Next

नाशिक : थर्टीफर्स्टच्या रात्री कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावर वाद घालून एका इसमावर गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या डोंबिवलीच्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पंचवटीत अटक केली. संशयित अजय महापुरे (२२, रा. रामनगर, कल्याण, मूळ पंचवटी) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शहरात शनिवारी गस्त घालत असताना अजय हा कमरेला गुप्तीसारखे शस्त्र लावून पंचवटीतील भक्तिधामसमोर फिरत असल्याची माहिती उपनिरीक्षक बलराम पालकर यांच्या पथकातील शिपाई संदीप भुरे यांना मिळाली. पोलिसांनी भक्तिधाम येथे सापळा रचून महापुरेला अटक केली. पोलिसांनी त्याचा समाचार घेतला असता त्याने ३१ डिसेंबर रोजी रात्री कल्याण येथील एका हॉटेलसमोर लोकांशी नाचण्यावरून वाद घालत फिर्यादी अरुण सरोज (२२, रा. गणेशनगर, कल्याण) यांच्यावर गुप्तीने वार करत गंभीर जखमी केले. महापुरे व त्याच्या साथीदारांविरुद्ध डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The Dombivali crime convicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.