शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मातोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:03 AM

मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

मातोरी : मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.मातोरी गावातील आळंदी डावा कालव्याला लागून असलेल्या प्रवीण कैलास धोंडगे या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायींवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून जखमी केले. तसेच एका वासराला शेजारील मोकळ्या जागेत ओढत नेत फडशा पाडला. रात्री जनावरे हंबरण्याचा आवाज येऊ लागल्याने धोंडगे यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता गायी जखमी अवस्थेत आढळून आल्या तर वासराला ओढून नेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी वासराचा शोध घेतला असता पाटाच्या कडेला मृतावस्थेत वासरू आढळून आले. बिबट्याच्या वास्तव्याने परिसरात भीती निर्माण झाली असून याबाबत वन विभागाने बिबट्याच्या पायांच्या ठशांवरून माग घेतला असता गेल्या काही दिवसांपासूनच वास्तव्य असल्याचे सांगितले. सदरील मृत जनावराचा वन विभागाने पंचनामा करत पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या