शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

थकबाकीदार मतदानापासून वंंचित

By admin | Updated: January 28, 2015 23:52 IST

सहकारी संस्था निवडणूक : १५ विविध कार्यकारी संस्थांची मतदार यादी प्रसिद्ध

कळवण : तालुक्यातील १५ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यातून थकबाकीदार सभासदांची नावे कमी करण्यात आली आहेत. ९७व्या घटनादुरुस्तीनुसार होणाऱ्या निवडणुकीतून थकबाकीदार सभासद मतदार यादीतून गायब झाले आहेत. २०१३मध्ये झालेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सुधारणानुसार दि. ३१ आॅक्टोबर २०१४ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी कळवण तालुक्यातील १५ विविध कार्यकारी संस्थांसह जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. १५ विविध कार्यकारी संस्थांच्या अंतिम मतदार याद्या सहाय्यक निबंधक कार्यालय व विविध कार्यकारी संस्था कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी संस्थेची प्रारूप मतदार यादी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध केली असून, मतदार यादीवर २५ जानेवारीपर्यंत हरकती नोंदविल्या जाणार आहेत. त्यावर ११ फेब्रुवारी २०१५ रोजी निर्णय होऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तालुक्यातील १५ विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये भेंडी विविध कार्यकारी संस्था, वरखेडा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, मोकभणगी विविध कार्यकारी संस्था, विठेवाडी आदिवासी विविध कार्यकारी संस्था, अभोणा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सिद्धेश्वर आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गुरुकृपा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, वडाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, देसगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था, पाटविहीर आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गणोरे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, हिंगवे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गोपाळखडी आदिवासी विविध कार्यकारी संस्था व ओतूर आदिवासी विविध कार्यकारी संस्था या संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत निवडणुकीमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील वातावरण पुन्हा तापणार असून, मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.९७व्या घटना दुरुस्तीमुळे सहकारी संस्था अधिनियमात बदल झाल्याने विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकीचे निकष बदलले आहेत. सहकारी संस्था अधिनियमानुसार विविध कार्यकारी संस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, नागरी पतसंस्था, सहकारी बँक यांच्या थकबाकीदार सभासदांचा मतदानाचा अधिकार घटनादुरुस्तीने संपुष्टात आला आहे. थकबाकीदार सभासदांना मतदाना-पासून वंचित राहावे लागणार आहे. नियमित कर्जदारालाच आता गावाच्या विविध कार्यकारी संस्थेचे संचालक होता येणार आहे. त्यामुळे अनेकांची स्वप्ने भंगणार आहेत. नवीन रचनेत बिगर कर्जदार व आर्थिक दुर्बल घटक नसतानाही आर्थिक दुर्बल घटक जागेवर निवडणूक लढविणाऱ्या सभासदावर गंडांतर आले आहे. बिगर कर्जदार व आर्थिक दुर्बल घटक या जागा कमी केल्याने संचालक संख्या १७ वरून १३ केली आहे , तालुक्यात होवू घातलेल्या पहिल्या टप्प्यातील विविध कार्यकारी संस्था निवडणुकीत केवळ कर्जदार सभासदाला निवडणुकीत उभे राहता येणार आहे बिगर कर्जदारांना संचालक पदापासून दूर जावे लागणार आहे . सहकारी संस्था निवडणुकीमध्ये आचारिसहता लागू केली असून तिचे पालन करावे लागणार आहे. सार्वित्रक निवडणुकीप्रमाणे अर्ज दाखल केल्यापासून मतदान संपेपर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे