शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:56 IST

सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीपात्रात कोसळल्याची घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी रस्ता: एक ठार तर दोघे गंभीर जखमी

सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीपात्रात कोसळल्याची घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नालासोपाारा येथील पाच मित्र मारझो कार (क्र. एम. एच. ४८ बी. टी. १४१३) ने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतांना सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर सदर अपघात झाला. देवनदीच्या पुलावरुन कार जात असतांना अचानक कुत्रे आडवे आले. कारचालकाने कुत्र्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कार देवनदीच्या पुलाला धडकून लोखंडी कठडे तोडून देवनदीच्या पात्रात कोसळली. सुमारे २० फुट खोल नदीपात्रावर कार खडकावर आदळल्याने मोठा आवाज झाला. नदीला पाणी कमी झाल्याने खडकावर कार आदळून मोठा आवाज आला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी धाव घेऊन मदतकार्य केले.वावी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कारमध्ये अडकलेल्या एका जखमीला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कार चालक साहील अनिल ब्रीद (२४) रा. नालासोपारा हा जागीच ठार झाला तर अनिषेक शुक्ला (२५) रा. जयंत नक्ती (२४) रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, सतिष बैरागी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू