शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

वटार येथे डोगरऱ्यादेव उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:14 IST

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

यात एक प्रवेश द्वार असते.याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात.या खळीच्या मघ्येभागी मांडवटाकला जातो.या मांडवाच्या मघ्येभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जाता. रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदि लयबद्ध चालिवर नाचतात.या उत्सवात रात्रि देवदेवताचे कथन केले जाते.त्यासाठी थाळी लावण्यात येत.

 थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्येभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते.या काड़ीवर जोरात हात वरून खाली ओडल्यावर लयबद्ध असा आवाज येतो.याला ग्रामीण भागात थाळकर मनतांत.हां देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतातया उत्सावा सहभागी झालेल्या व्यक्ति भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते.हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊंन घरासमोर डोगऱ्यादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात.दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेनदाणे देतात.दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात.हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकाना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर देतात. असा हां पंधरा दिवस उत्सव चालतो.या उत्सवाची सांगता मार्गशीष माहिन्याच्या पोर्णिमाला होतो.या पोर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री डोगरातिल देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात.या ठिकाणी रात्री कोंबड़ा सोडला जातो.ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात.या पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते.तेव्हा या डोगऱ्यादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आनतात.

 जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात.तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हां उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहेया नंतर प्रसादा कार्यक्रम ठेवला जातो. तेव्हा गावतील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जाते. हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून कार्य करणाऱ्यास एक ते दिड लाखापर्यत खर्च येतो.कोट:-आमचे हां डोगऱ्यादेव उत्सव आमच्या वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करीत नाही.शिव ओलांडत नाही.पंधरा दिवस कड़क उपवास करावा लागतो.भूतलावरील वनस्पती,वन्यजीव ,यांचे संरक्षण संवर्धन व्हावे.मानवजातीचे कल्याण व्हावे.या गावातील,वस्तीतिल सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटीव्हावे सर्व लोक सुखसमृदिने नंदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते- तात्याभाऊ सोनवणे. वटार येथील डोगऱ्यादेव उत्सवात सहभागी झालेले आदिवाशी बांधव. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक