डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

By Admin | Updated: March 22, 2017 21:04 IST2017-03-22T21:04:56+5:302017-03-22T21:04:56+5:30

महाराष्ट्रभर सुरु असलेल्या डॉक्टरांवरील हल्यांचा निषेध म्हणून व सरकारने याची दखल घेऊन डॉक्टरांना योग्य ती

The doctor's unhappiness started | डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - महाराष्ट्रभर सुरु असलेल्या डॉक्टरांवरील हल्यांचा निषेध म्हणून व सरकारने याची दखल घेऊन डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स बेमुदत संपावर जात आहेत. सर्व बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा या थांबविण्यात येत आहेत.
पुढील तीन दिवस सर्व वैदयकिय सेवा देखील बंद राहतील. रुग्णांच्या सोयीसाठी सर्व सरकारी रुग्णालये तसेच महापालिकेच्या वैदयकीय सेवा उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने नाईलाजास्तव आम्हांला हे कठोर पाउल उचलावे लागत असल्याचे आएमए च्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. सतत दडपणाखाली काम करणे अशक्य झाल्याने आम्ही हे स्वसुरक्षेसाठी करीत आहोत. निकोप सामाजिक व्यवस्थेसाठी सर्व सुजाण नागरिकांनी आम्हांला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही डॉक्टरांनी केले.

Web Title: The doctor's unhappiness started