शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

जनावरांची औषधे पडून, डॉक्टरांना नोटिसा

By admin | Updated: May 7, 2014 22:15 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समितीसह मासिक बैठकीवर बहिष्कार टाकणारे पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समितीसह मासिक बैठकीवर बहिष्कार टाकणारे पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात जनावरांची औषधे न उचलल्याने संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.जिल्हा परिषदेची पशुसंवर्धन समितीची बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जिल्‘ातील पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन विकास अधिकारी अनुपस्थित होते. समिती सदस्य नांदगावचे पंचायत समिती सभापती विलास अहेर यांनी नांदगाव तालुक्यात जनावरांना आवश्यक ती लस व औषधांचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली. त्यावेळी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी दिंडोरी पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या पशुसंवर्धन विभागाच्या गुदामातून जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी औषधे उचललेली नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)औषधे उचलावीच लागतीलजिल्‘ातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मासिक बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे, असे नाही. मात्र त्यांनी जनावरांसाठी आलेली औषधे व लस पुरवठा ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत जनावारांना वितरित केली पाहिजे. अन्यथा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिला आहे.