लायन्स क्लबतर्फे डॉक्टरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:03+5:302021-07-07T04:17:03+5:30
या वेळी डॉक्टर्स, आर्किटेक्ट व सीए यांचा पुष्पगुच्छ देण्याऐवजी इकोफ्रेंडली नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सेवेबद्दल ...

लायन्स क्लबतर्फे डॉक्टरांचा गौरव
या वेळी डॉक्टर्स, आर्किटेक्ट व सीए यांचा पुष्पगुच्छ देण्याऐवजी इकोफ्रेंडली नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल विनोद कपूर होते. या वेळी क्लबचे अध्यक्ष नानासाहेब चव्हाण, सेक्रेटरी सुजाता कासलीवाल व कोषाध्यक्ष मेधाविनी सोनवणे यांंच्या उपस्थितीत डॉ. अजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. विलास पाटील, डॉ. संध्या पाटील, डॉ. शैलजा गोंधळे, डॉ. गिरीश चाकोरीकर, डॉ. मकरंद धर्माधिकारी, डॉ. सोनाली गायकवाड, डॉ. विद्या उगले, डॉ. नेहा गोंधळे, डॉ. महेश पाटील, डॉ. अजिंक्य रत्नपारखी, डॉ. हर्षल गोंधळे, डॉ. नीलिमा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला तसेच आर्किटेक्ट सुरेश गुप्ता व सीए चंद्रकांत गुजराथी यांचादेखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अभय चोकसी, सुभाष बडगुजर, प्रकाश पठाडे, भाऊ सोनवणे, बाबूभाई खेतसी पटेल, दीपक रत्नपारखी, जयश्री चव्हाण, रत्ना पठाडे, रमिला पटेल आदी उपस्थित होते.
फोटो- ०५ लायन्स क्लब
लायन्स क्लब ऑफ नाशिकच्या वतीने डॉक्टर्स, आर्किटेक्ट व सीए यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विनाेद कपूर, नानासाहेब चव्हाण, सुजाता कासलीवाल, मेधाविनी सोनवणे, अभय चोकसी, सुभाष बडगुजर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य.