डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

By Admin | Updated: July 6, 2014 00:15 IST2014-07-05T22:25:15+5:302014-07-06T00:15:17+5:30

डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

Doctor stampede, patient wind | डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

 

नाशिक : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या
बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होती. मात्र डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे
हाल झाल्याचे चित्र होते. दुसरीकडे शासनाने संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा आदेश
दिला असून, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मात्र लेखी आदेश नसल्याने संपात सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईस नकार दिला आहे.
जिल्हा परिषदेचे १०३ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ५७७ उपकेंद्रे आहेत. त्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर राजपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व उपकेंद्रांवर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी रुग्णांचे हाल होऊ नये, म्हणून कंत्राटी स्वरूपात दीडशेहून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती केलेले निम्मे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांत हजर झालेच नसल्याचे कळते.(प्रतिनिधी)

Web Title: Doctor stampede, patient wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.