सादिकनगरमध्ये डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST2020-12-23T04:11:34+5:302020-12-23T04:11:34+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रविवारी (दि.२०) रोजी सकाळी अकरा वाजता शेख हे त्यांच्या सादिक नगरमधील दवाखान्यात आले. यावेळी ...

Doctor beaten in Sadiknagar | सादिकनगरमध्ये डॉक्टरला मारहाण

सादिकनगरमध्ये डॉक्टरला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रविवारी (दि.२०) रोजी सकाळी अकरा वाजता शेख हे त्यांच्या सादिक नगरमधील दवाखान्यात आले. यावेळी दवाखान्याच्या बाहेर भिंतीवर इरफान शेख ऊर्फ चिपड्या यांनी वर्तमानपत्रातील कात्रण लावले होते. शेख यांनी त्यास आक्षेप घेत ते कात्रण काढून टाकले. त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या सुमारास याचा राग येऊन संशयित इरफान शेख ऊर्फ चिपड्या याने दवाखान्यात येऊन शेख यांना ‘तुम्ही माझ्या बायकोला वाईट वागणूक का दिली...’ असा जाब विचारुन कुरापत काढली. यावेळी त्याचा भाऊ संशयित इम्तियाच शेख, फैसल प्यारे मोहम्मद यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच संशयितानी येऊन डॉक्टर शेख यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच दवाखान्यातील साहित्याची फेकाफेक करून कॅबिनची तोडफोड करत धिंगाणा घातला. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरा नगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Doctor beaten in Sadiknagar