मालेगाव जिल्ह्यात देवळ्याचा समावेश नको

By Admin | Updated: June 27, 2014 00:18 IST2014-06-26T20:58:53+5:302014-06-27T00:18:50+5:30

मालेगाव जिल्ह्यात देवळ्याचा समावेश नको

Do not include the temple in Malegaon district | मालेगाव जिल्ह्यात देवळ्याचा समावेश नको

मालेगाव जिल्ह्यात देवळ्याचा समावेश नको


लोहोणेर : नियोजित मालेगाव जिल्ह्यात देवळा तालुक्याचा समावेश करण्यात येऊ नये असे ठराव देवळा तालुक्यातील ग्रामपंचायती, विकास सोसायटींनी केले असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे गटनेते केदा अहेर यांनी दिली. अनेक वर्षांपासून देवळा तालुक्याची नाळ नाशिक जिल्ह्याशी जोडलेली आहे. असे असताना देवळा तालुक्यातील जनतेला विश्वासात न घेता काही राजकीय अपप्रवृत्ती मालेगाव जिल्हानिर्मितीचा घाट घालीत आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सध्याच्या जिल्ह्यातच रहावयाचे असून ग्रामपंचायत, विकास सोसायटी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी या संदर्भात ठराव केले आहे. दोन दिवसांत तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विरोध दर्शवणार आहोत. तालुक्याचा समावेश नियोजित मालेगाव जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Do not include the temple in Malegaon district