जीवनात कुणाशीही वैर ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:29 IST2020-01-13T23:45:47+5:302020-01-14T01:29:36+5:30
आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले.

जीवनात कुणाशीही वैर ठेवू नका
नाशिक : आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. सोमवारी (दि. १३) सकाळी राका कॉलनीत पुण्यप्रकाशच्या प्रांगणात आयोजित ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ या विषयांवर ते बोलत होते.
यावेळी प्रवचनात त्यांनी अनेक उदाहरणे दिली. व्यक्तीवर राग धरला की आपले जीवन निष्फळ बनते, कारण कटुता ही माणसाला खाऊन टाकते आणि जर वेळ निघून गेली तर त्याचा उपयोगही होत नाही. संबंधो का टॉप सिक्रेट यात जीवनाचे ५ महत्त्वाचे अंग येतात त्यावर विजय मिळविता आला पाहिजे. रिलेशन, रिव्हीलेशन, रिप्लेक्शन, रिजेक्शन, रिसेप्शन हे अंग आहेत. संघर्षमय जीवनावर बोलताना जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर म्हणाले की, आपले संबंध सगळ्यांशी चांगले ठेवा, तरच आपल्याला मृत्युदेखील चांगला येऊ शकतो.
यावेळी आचार्य पद्मसुंदर सुरी तसेच राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, शेखर सराफ, गौतम सुराणा, सुंदर शहा, महेश शहा, राजन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी (दि. १४) सकाळी ९.३० वाजता राका कॉलनी, शरणपूररोड येथे मूल्योंकी मार्केट व्हॅल्यू या विषयावर प्रवचन होणार आहे.