मानवधन संस्थेची आदिवासींसमेवत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST2017-10-18T00:02:48+5:302017-10-18T00:12:55+5:30
दुर्गम आदिवासी भागातील कष्टकºयांना दिवाळीनिमित्त फराळाचे विविध पदार्थ, नवीन कपडे, चपला, बूट यांसह मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करीत मानवधन संस्थेने यंदा सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त संस्थेतर्फे इगतपुरीतील आदिवासी पाड्यांवर विविध साहित्यांच्या मदतीतून आदिवासी बांधवांमध्ये आनंदचा गोडवा भरण्यात आला. नवीन कपडे व फराळाचा आस्वाद घेऊन आदिवासींनीही आनंदाने दीपोत्सवात रंग भरले.

मानवधन संस्थेची आदिवासींसमेवत दिवाळी
नाशिक : दुर्गम आदिवासी भागातील कष्टकºयांना दिवाळीनिमित्त फराळाचे विविध पदार्थ, नवीन कपडे, चपला, बूट यांसह मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करीत मानवधन संस्थेने यंदा सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त संस्थेतर्फे इगतपुरीतील आदिवासी पाड्यांवर विविध साहित्यांच्या मदतीतून आदिवासी बांधवांमध्ये आनंदचा गोडवा भरण्यात आला. नवीन कपडे व फराळाचा आस्वाद घेऊन आदिवासींनीही आनंदाने दीपोत्सवात रंग भरले. दिवाळीनिमित्त मानवधनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्र म राबविण्यात आला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आदिवासींना दिवाळीचा आनंदही उपभोगता येत नाही. शहरातील नागरिकांप्रमाणेच आदिवासी बांधवांनाही दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा, या उद्देशाने संस्थेतर्फे इगतपुरीतील आदिवासी दुर्गम पाड्यावर फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांनी पाड्यावर स्वच्छता अभियानही राबविले. पाड्यावरील गरजू व गरीब मुलांना व ज्येष्ठांनाही कपडे वाटप करण्यात आले. महिलांनाही विविध वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे व सचिव ज्योती कोल्हे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फराळाच्या पदार्र्थांबरोबरच विविध प्रकारची खेळणी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आकाशकंदील वाटप करून दीपोत्सवाचे महत्त्वही पटवून देण्यात आले.