शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारात नवचैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:18 AM

भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तूंसह वाहन व घरे खरेदी केल्याने बाजारपेठेत गेल्या वर्षभरापासून असलेले मंदीचे वातावरण संपूर्णपणे दूर होऊन बाजारात नवचैतन्य संचारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तूंसह वाहन व घरे खरेदी केल्याने बाजारपेठेत गेल्या वर्षभरापासून असलेले मंदीचे वातावरण संपूर्णपणे दूर होऊन बाजारात नवचैतन्य संचारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी चोख सोन्यासोबतच सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्ती, पूजेची थाळी व इतर मानाच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी ताट, ग्लास, वाटी आदी भांड्यांची केलेली खरेदी यामुळे सराफ बाजाराने विक्रीचा उच्चांक गाठला. तर लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. दोन्ही दिवसांची मिळून नाशिकमधील बाजारपेठेत सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहरातील अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या नवीन व्यवसायाची सुरुवात केली. तर अनेकांनी घराचे स्वप्न साकार करीत आपल्या हक्काच्या नवीन घरात प्रवेश केला. स्थिरस्थावर झालेल्या नाशिककरांनी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असले तरी व्यावसायिक वाहनांचीही ग्राहक ांनी लक्ष्मीपूजेला मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले. शेतकºयांनी ट्रॅक्टर आणि शेतीउपयोगी साधनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले.दिवाळीच्या उत्साहावर पाणीशहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. मात्र ऐन दिवाळीच्या आठवडाभरात सातत्याने ढगाळ वातावरण आणि पावसाच्या संतत सरी यामुळे औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाºयांना बोनसच्या स्वरूपात हातात पैसा येऊनही मनाप्रमाणे खरेदी करता न आल्याने त्यांच्या दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरल्याचे दिसून आले. अनेक नाशिककरांनी पावसाची आणि कामाची वेळ सांभाळून आपल्या कुटुंबीयांसाठी खरेदी केली.सुटीमुळे ऐन उत्सवात खरेदीकामगारवर्गाला शनिवारपासून सुट्या असल्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. अनेकांनी लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केले असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले होते. मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दीपोत्सवात रोज किमान तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांची विक्री झाली असून, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हा आकडा तीन ते साडेतीन हजारांवर पोहोचल्याचे वितरकांनी सांगितले.सराफ बाजारात गुंतवणूक दारांसह सामान्य ग्राहकांनीही खरेदीसाठी उत्साह दाखविल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी दिवाळीच्या काळात चांगली उलाढाल झाली. सोन्यातून मिळणारा परतावा अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी चोख सोने खरेदी करण्यास पसंती दिली.- चेतन राजापूरकर, अध्यक्ष,नाशिक सराफ असोसिएशननाशिक शहरातील बांधकाम व्यवसायात दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात एकूण पाचशे फ्लॅटची विक्री झाल्याचा प्राथमिक अंंदाज असून दीपावलीच्या कालावधीत ज्यांनी घरांची चौकशी केली, असे ग्राहक अजूनही घर खरेदीत उत्सुकता दाखवित आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.- सुनील गवांदे, पदाधिकारी, नरेडकोगेल्या वर्षभराच्या तुलनेत या दिवाळीत परिस्थिती सुधारली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ग्राहक नाशिकमध्ये घर खरेदीला मोठ्या प्रमाणात उत्सुक असून शहरातील २५ ते ४५ लाख रुपये किमतीच्या घरांना अधिक मागणी आहे. यात रेडीपजेशनसोबतच निर्माणाधीन प्रकल्पांमधील फ्लॅट बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान आवास योजनेची सवलत आणि व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या योजना ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहित केल्याचे दिसून आले.- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजारbusinessव्यवसाय