दिव्यांग महिलांनी सादर केला कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:59 IST2018-03-27T00:59:44+5:302018-03-27T00:59:44+5:30
दिव्यांग महिलांचा मेळावा इंद्रकुंड येथील पंडित पलुस्कर सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात दिव्यांग महिलांनी गायन, नाट्य, नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. अशोकस्तंभ येथील तुळसाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग महिलांनी सादर केला कलाविष्कार
पंचवटी : दिव्यांग महिलांचा मेळावा इंद्रकुंड येथील पंडित पलुस्कर सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात दिव्यांग महिलांनी गायन, नाट्य, नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. अशोकस्तंभ येथील तुळसाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक हिमगौरी अहेर, शिवाजी धुमाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. डॉ. यशवंत बर्वे यांनी कार्यक्र माचे अध्यक्षस्थान भूषविले. यात सात अंध महिलांनी गायन, चार मूकबधिर महिलांनी नाटक, तर चार अपंग महिलांनी नृत्याचे सादरीकरण केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करणाऱ्या दिव्यांग महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. अपंग असले तरी न घाबरता समाजात मानाने जगण्याचे काम करावे, असे मत मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. यावेळी शोभा काळे, सचिन पाटील, किशोर काळे, मनीषा स्वामी, कैलास गोडसे, प्रसन्न राव आदी उपस्थित होते.
महिलांचा सत्कार
समाजात विविध क्षेत्रात काम करणाºया मनीषा स्वामी, उमा नारायण, शोभा पवार, डॉ. संगीता पवार, संगीता निकम, शैलजा खाडीलकर, दीप्ती राऊत या सात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.