नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु वारी (दि. १४) डिव्हाइन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या सायकल फेरीमध्ये शंभराहून अधिक दिव्यांग सायकलिस्ट सहभागी झाले होते. टॅण्डम सायकल, तीनचाकी सायकल, व्हीलचेअर अशा विविध प्रकारच्या सायकल वापरण्यात आल्या. या फेरी आयोजनाचे हे सहावे वर्ष होेते. गंगापूर रस्त्यावरील जेहान सर्कल येथून सकाळी आठ वाजता फेरी सुरू झाली. प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कलमार्गे कुसुमाग्रज स्मारकाजवळ समारोप करण्यात आला.शुभारंभप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते. सायकल फेरीत सहभागी दिव्यांगांनी हेल्मेट वापरा, वाहन चालविताना मोबाइल टाळा असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचेही आवाहन केले.
दिव्यांगांची ‘डिव्हाइन’ सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:50 IST
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु वारी (दि. १४) डिव्हाइन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांगांची ‘डिव्हाइन’ सायकल फेरी
ठळक मुद्देबालकांचा सहभाग : आरोग्य जनजागृतीसाठी उपक्रम