मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकारी संजय केदार, नगसेवक नामदेव लोंढे, शैलेश नाईक, श्रीकांत जाधव, हरिभाऊ वरंदळ, नगरसेवक शीतल कानडी, सुजाता भगत, कार्यालय निरीक्षक नितीन परदेशी, लेखापाल विष्णू हाडके, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, दत्ता वायचळे यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांग बांधवांचा पुष्प व हातरुमाल देऊन सन्मान करण्यात आला.
सिन्नर नगर परिषदेद्वारे दिव्यांग बांधव यांचे कल्याणार्थ राखीव ठेवण्यात आलेल्या ५ टक्के राखीव निधीतून १८ लाभार्थींच्या बँक खात्यावर प्रत्येकी ४० हजार व यापूर्वी ज्या लाभार्थींना २५ हजारचा निधी वितरित करण्यात आला होता अशा सहा लाभार्थींच्या बँक खात्यावर प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा निधी २४ दिव्यांग बांधव यांना त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येत आहे. उर्वरित निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असे मुख्याधिकारी केदार यांनी सांगितले.
दत्ता वायचळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण पाचोरे, नंदू शिरसाठ, केशव बिडवे, भाऊसाहेब सांगळे, प्रकाश भाटजिरे, नामदेव लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले व नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, सर्व नगरसेवक, नगरसेवकांचे आभार मानले. शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सिन्नर शहरातील २३४ दिव्यांग बांधव यांनी आपली नोंदणी नगर परिषद कार्यालयात केलेली असून, यापूर्वी ९ दिव्यांग बांधव यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ११४ दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी ४० हजार रुपये याप्रमाणे निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती दिव्यांग कक्ष प्रमुख अनिल जाधव यांनी दिली.
यावेळी अनुराधा लोंढे, प्रकाश घुगे, गणपत नाठे, भगवान पगार, चंद्रकांत पवार, रघुनाथ पावशे, सुनील जगताप, दौलत ढोली, चंदू पवार, आनंद सातभाई, गिरीश गोळेसर, मालन आव्हाड, शेखर खुळे, प्रशांत गायकवाड, मंगेश काळे, आकाश पगारे, साधना अशोक पानसरे, सीमा बाकळे, कादूबाई पाठे, नसरीन शेख आदी उपस्थित होते.