दिव्यांग, नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:48+5:302021-02-05T05:44:48+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २५) मतदार दिनानिमित्त नवमतदार व दिव्यांग मतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले. प्रारंभी दिप ...

Divyang, distribution of voter ID cards to new voters | दिव्यांग, नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप

दिव्यांग, नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २५) मतदार दिनानिमित्त नवमतदार व दिव्यांग मतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले. प्रारंभी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार आदी उपस्थित होते. यावेळी १८ ते २० वयोगटातील १० नवमतदार व दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळाखपत्र देण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रिया वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिव्यांग मतदारांना कार्यालयाबाहेर येऊन ओळखपत्र वाटप करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कोट-

विभागीय आयुक्त राज्य पातळीवर एकाच वेळी निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असते. एकाच वेळी सर्वत्र राबविण्यात येणारी मतदान व निवडणूक प्रक्रिया निर्विवाद व अचूकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची आहे.

-विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

कोट-

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता इलेक्टरर्स फोटो आयडेंटी कार्ड मिळण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत तीन संकेतस्थळांवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया राबवत असताना लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध आहोत-

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

इन्फो

मोबाइल ॲपद्वारे मतदार ओळखपत्र डाउनलोड शक्य

विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ जानेवारीपर्यंत नाव नोंदणीमध्ये युनिक मोबाइल क्रमांक असलेल्या नवमतदारांना एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येणार असून १ फेब्रुवारी नंतर युनिक मोबइल क्रमांक असलेल्या सर्व मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या तीनही संकेतस्थळांद्वारे व वोटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे मतदार ओळखपत्र डाउनलोड करणे शक्य होणार आहे. तसेच ज्या मतदारांकडे युनिक मोबाइल क्रमांक नाही त्यांनाही संकेतस्थळावरून मोबाइल क्रमांक टाकून ओळखपत्र डाउनलोड करता येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.

(फोटो - २५पीएचजेएन ८९) दिव्यांग मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे. समवेत वर्षा मीना, दत्तप्रसाद नडे, स्वाती थविल आदी.

Web Title: Divyang, distribution of voter ID cards to new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.