नाशिक : लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात पती-पत्नीचे मतभेद होऊन दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले, परिणामी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पती नोकरी निमित्त दुबई निघून गेला. त्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या घटस्फोट दाव्याची सुनावणी न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेऊन पतीने दिलेला घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाने लॉकडाऊनच्या काळात घेतलेला हा पहिलाच निकाल मानला जात आहे.मूळचे नाशिक येथील रहिवासी असलेल्या मुला-मुलीने २०१८ मध्ये विवाह केला. लग्नानंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले. दोघांमध्ये समजूत घडविण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्यात यश आले नाही, परिणामी दोन्ही बाजूंनी पोलीस केसेस करण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांनी त्यांचे समुपदेशन करून समेट घडविण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे दोन्ही बाजूंनी केसेस मागे घेण्यात आल्या. दरम्यान, पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या खटल्याची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी काही कारणास्तव घेण्यात आली, न्यायालयाने हा खटला रद्द बातल केला, मात्र याच काळात पती- पत्नीने कौटुंबिक न्यायालयात फेब्रुवारी २०२० मध्ये आपसमजुतीने घटस्फोट घेण्याचा अर्ज दाखल केला होता, दरम्यानच्या काळात पती कामानिमित्त दुबई येथे निघून गेला. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी पतीसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधून दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेतले व दोघांच्या सहमतीने घटस्फोट मंजूर केला. दोन्ही बाजूंनी अॅड. दीपक पाटोदकर व श्रीकांत मुंदडा यांनी युक्तिवाद केला.कोरोनाकाळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकोरोना संकटाच्या काळात न्यायालयावरदेखील कामकाजात काही प्रमाणात निर्बंध आलेले असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रकरणाची सुनावणी केली. कौटुंबिक न्यायालयात आशा प्रकारे हा पहिलाच खटला निकाली काढण्यात आला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाम्पत्याला घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 01:03 IST
लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात पती-पत्नीचे मतभेद होऊन दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले, परिणामी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पती नोकरी निमित्त दुबई निघून गेला. त्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या घटस्फोट दाव्याची सुनावणी न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेऊन पतीने दिलेला घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयाने लॉकडाऊनच्या काळात घेतलेला हा पहिलाच निकाल मानला जात आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाम्पत्याला घटस्फोट
ठळक मुद्देपती दुबईत, पत्नी नाशिकला : लॉकडाऊनमधील पहिला महत्त्वपूर्ण निकाल