हज यात्रेकरूंसाठी विभागीय कार्यालय सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:23+5:302021-01-08T04:43:23+5:30
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुंबई येथे जावे लागत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम ...

हज यात्रेकरूंसाठी विभागीय कार्यालय सुरू करावे
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुंबई येथे जावे लागत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी पंधरा हजारांहून अधिक तर उत्तर महाराष्ट्रातून लाखाहून अधिक मुस्लीम भाविक हज यात्रेसाठी जातात. दरम्यान, ठरावीक यात्रेसाठी हज यात्रा व इतर वर्षभर उमराह सुरू असतो. मुस्लीम बांधवांच्या शिष्टमंडळाने गोडसे यांची भेट घेऊन नाशिक येथे हज यात्रेकरूंसाठी विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गोडसे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन नाशिक येथे हज यात्रेकरूंसाठी विभागीय प्रशासकीय कार्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम हज यात्रेकरूंच्या सोईसाठी लवकरच नाशिक येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मलिक यांनी दिले.