मंडल प्रबंधकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी
By Admin | Updated: May 9, 2016 00:06 IST2016-05-08T23:26:18+5:302016-05-09T00:06:43+5:30
मंडल प्रबंधकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी

मंडल प्रबंधकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी
नाशिकरोड : रेल्वे भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी केली.
कुंभमेळ्यानंतर रेल्वे भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता, भुसावळ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे भुसावळ मंडल सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्रा, वरिष्ठ मंडल अभियंता दक्षिण विभाग सी. जे. चव्हाण आदि अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजेपासून नाशिकरोड रेल्वेस्थानक व परिसराची पाहणी केली. कुंभमेळ्यात झालेली कामे त्याचा प्रवाशांना होणारा फायदा, प्रवाशांच्या अडी-अडचणी व आगामी दोन वर्षांत करावयाची कामे याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी दौऱ्यात माहिती घेऊन चर्चा केली. महत्त्वाच्या कामाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्या.
यावेळी स्टेशन प्रबंधक एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जे.ए. पठाण, अतुल देशपांडे, नितीन बडगुजर, कुंदन महापात्रा, एफ.जी. सय्यद, ए. आर. अत्रे, सुनील वासेकर, श्याम कुलकर्णी, भार्गव, सोले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
’