शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागसभेत प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:25 IST

वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.

नाशिकरोड : वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी सकाळी प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत नगरसेविका रंजना बोराडे यांनी मनपाची जुनी इमारत व वाचनालय धूळखात पडले असून, त्याच्यावर हजारो रुपये विनाकारण खर्च केला जात आहे. मनपाच्या अनेक इमारती, समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालय, हॉल आदी धूळखात पडले असून, त्याच्यावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जात आहे. मनपाने रहिवाशांच्या उपयोगासाठी बांधलेल्या इमारती, हॉल या सामाजिक संस्थेस चालविण्यात देण्यात याव्या, अशी मागणी बोराडे यांनी केली.वडनेरमार्गावरील अनधिकृत भंगरची दुकाने हटविण्यात यावी, बंद पथदीप सुरू करावे, खराब झालेल्या पथदीपाचे पोल बदलण्यात यावे, भुयारी गटारीचे सर्वेक्षण करावे. अनेक हॉटेल व्यावसायिक नाल्यांमध्ये घाण पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका संगीता गायकवाड, अंबादास पगारे यांनी केली. नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी दुर्गा उद्यान येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक धूळ खात पडले असून, अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावे, अशी मागणी केली.बैठकीला नगरसेवक केशव पोरजे, नगरसेवक मीराबाई हांडगे, सुनीता कोठुळे, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर नगरसेवक व अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची पाहणी केली.वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यातनगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी वालदेवी नदीमध्ये गटारी, नाले, भूमिगत गटारी यातील दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिसळले जात असल्याने वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील पाण्याला उग्र वास येत असून परिसरातील रहिवाशांना त्वचेचे आजार होत आहे. नदी पात्रात मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी त्वरित बंद करावे अन्यथा नदी पात्रात बसून उपोषण करू, असा इशारा गाडेकर यांनी दिला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाriverनदी