.प्रभाग क्र. ४१ मध्ये बचतगट मेळावामिळाले प्रशिक्षण : महिलांचा उत्स्फू र्त सहभाग
By Admin | Updated: July 25, 2014 00:38 IST2014-07-25T00:15:42+5:302014-07-25T00:38:28+5:30
.प्रभाग क्र. ४१ मध्ये बचतगट मेळावामिळाले प्रशिक्षण : महिलांचा उत्स्फू र्त सहभाग

.प्रभाग क्र. ४१ मध्ये बचतगट मेळावामिळाले प्रशिक्षण : महिलांचा उत्स्फू र्त सहभाग
सिडको : येथील प्रभाग क्रमांक ४१ गोविंदनगरमधील जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने बचतगट प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शंभराहून अधिक बचतगटांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अश्विनी बोरस्ते होत्या.
गोविंदनगर भागात जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी बचतगट प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी महिलांना बचतगटाची संकल्पना, कार्यव्यवस्थापन पद्धती, रेकॉर्ड, किपिंग, बॅँक वित्तीय पुुरवठा अंतर्गत कर्जवाटप या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच फक्त बचतगट स्थापन करून चालणार नाही, तर तो शास्त्रोक्त पद्धतीने चालविला पाहिजे. यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचेही बोरस्ते यांनी
सांगितले. यापुढेही शहरातील बचतगटांसाठी अशा कार्यशाळा राबविण्यात येतील, असा संकल्प यावेळी बोरस्ते यांनी केला. बचतगट प्रशिक्षण कार्यक्रमात यावेळी सुमारे शंभराहून अधिक बचतगटांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण घेण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव अॅड. जयश्री दळवी, दीपाली मुकणे, अनिता पांगारकर, संगीता खाडे, ज्योती ठोकळे, कविता मंडलिक, भारती भरीतकर, पूजा गौंड, कांता जाधव, संगीता पाटील, संगीता भडकर, आशा गायकवाड आदि सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)