दिव्य चेतनाने दिला पालक गेलेल्या शंभर मुलांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:08+5:302021-08-17T04:21:08+5:30
अशोक स्तंभ येथील रूंग्टा हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमात दिव्य चेतनाचे सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, संस्थेच्या उपाध्यक्ष कांता ...

दिव्य चेतनाने दिला पालक गेलेल्या शंभर मुलांना आधार
अशोक स्तंभ येथील रूंग्टा हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमात दिव्य चेतनाचे सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, संस्थेच्या उपाध्यक्ष कांता राठी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना मदत म्हणून शैक्षणिक मदत देण्याबरोबरच कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे तसेच तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थेचे मानद सचिव प्रशांत पाटील यांनी दिली. मधुकर ब्राह्मणकर यांनी पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मागे न लागता मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन प्रगती करावी, असे सांगितले तर संस्थेच्या उपाध्यक्ष कांता राठी यांनी एकत्रित प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणार असल्याचे सांगितले.
यावेळी उद्योजक अरविंद महापात्रा तसेच अश्विनी देशपांडे, विजय बाविस्कर व घनश्याम येवला आणि काही पालकांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
यावेळी समुपदेशक सुवर्णा पाटील, सुवर्णा मोरे तसेच मेंटार स्वप्निल महाले, कांतीलाल राठोड, शीतल कोरडे, मनीषा हलकंदर, मोनाली देशमुख, सुप्रिया जाधव यांनी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत करण्यासाठी तयारी दर्शवली. सूत्रसंचालन जया पटेल यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली दाबक यांनी केले.
यावेळी समन्वयक अंजली राठी, अर्चना येवला, रोज अलुर, उज्ज्वला मुंदडा, सोनाली दाबक, आर्किटेक्ट स्मिता वाणी, रेखा कोतकर उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर १६ दिव्यचेतना