दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी प्रत्येकी ४० हजाराचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 18:18 IST2019-12-04T18:17:30+5:302019-12-04T18:18:54+5:30
सिन्नर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सिन्नर नगरपरिषद व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेत दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वावी येथील दिव्यांग बांधव रवींद्र सुपेकर यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरपरिषद व प्रहार दिव्यांग संघटना यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व दिव्यांग बांधव यांना उपनगराध्यक्ष लोखंडे, नगरसेवक श्रीकांत जाधव, सोमनाथ पावसे, नगसेविका शीतल कानडी, मालती भोळे यांचे सन्मानित करण्यात आले.

सिन्नर नगरपरिषद च्यावतीने दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनिल जाधव, रवींद्र सुपेकर, मयुरी नवले, नितीन परदेशी, गीतांजली मराडे, सचिन कापडणीस, भीमराव संसारे, अजय कोलते यांच्यासह दिव्यांग बांधव.
ठळक मुद्दे अनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगपरिषदेकडे आजपर्यंत २११ दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून उद्योग, व्यवसाय करीता अर्थसहय्य मिळावे म्हणून मागणी अर्ज केले असून त्यापैकी १०५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ४० हजार याप्रमाणे थेट निधी त्यांच्या खात्यावर वर्ग केल्
नगरपरिषदेच्या
वतीने देण्यात आलेल्या ३ टक्के राखीव निधीतून कोणता उद्योग, व्यवसाय सुरु केला याबाबत मनोगत घेण्यात आले. नगरपरिषदेच्या तीन टक्के राखीव निधीतून मिळालेल्या सहाय्यातून विष्णू घुगे यांनी पान शॉप टाकल्याचे सांगितले. नंदू शिरसाठ, गणपत नाठे, आनंद सातभाई, केशव बिडवे, मालन आव्हाड, नंदकुमार मुळे, आदेश बागूल, प्रशांत गायकवाड आदी दिव्यांग बांधव यांनी आपले उद्योग सुरु केल्याचे सांगितले.
फोटो क्र.- 04२्रल्लस्रँ03फोटो ओळी-